Chunnuk Chunnuk Tal Vajavi is a song in Marathi
छुन्नुक छुन्नुक
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
मोत्यांच्या कणसात डोलते तुझे देखणे रूप
विठ्ठला तुझे देखणे रूप
निळंसावळं धुकं भोवती निळंसावळं धुकं भोवती
कुणी फिरवला धूप
कुणी फिरवला धूप
ही भक्तीची फुलं उमलली ही भक्तीची फुलं उमलली
विठू तुझ्या चरणी रे विठू तुझ्या चरणी
छुन्नुक छुन्नुक
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
पंख उभारून ऊस उभा हा मोर जसा डोलतो
विठ्ठला मोर जसा डोलतो
मुळा नि कांदा कोथिंबिरितून
मुळा नि कांदा कोथिंबिरितून
विठू बघा नाचतो
विठू बघा नाचतो
घाम गाळिता रोप सुखावे
घाम गाळिता रोप सुखावे
विठू तुझी करणी रे विठू तुझी करणी
छुन्नुक छुन्नुक
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
मातीमधला अबीरबुक्का रोज लावितो भाळी
विठ्ठला रोज लावितो भाळी
तुझं नाव मी घेता देवा
तुझं नाव मी घेता देवा
पान वाजवी टाळी
पान वाजवी टाळी
विठ्ठल अवघा झाला मळा
विठ्ठल अवघा झाला मळा
ओठी अभंगवाणी रे ओठी अभंगवाणी रे
छुन्नुक छुन्नुक
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला गाणी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल