चला पंढरीसी जाऊं is a song in Marathi
पुंडलिका वरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
चला पंढरीसी जाऊं
चला पंढरीसी जाऊं
रखमादेवीवरा पाहूं
चला पाहूं रखमादेवीवरा पाहूं
डोळे निवतील कान
डोळे निवतील कान
मना तेथें समाधान
समाधान मना तेथें समाधान
हा चला पंढरीसी जाऊं
चला पंढरीसी जाऊं
रखमादेवीवरा पाहूं
चला पाहूं रखमादेवीवरा पाहूं
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
संता महंता होतील भेटी
संता महंता होतील भेटी
आनंदे नाचों वाळवंटी
आनंदे नाचों वाळवंटी
पांडुरंगाहरी पांडुरंगाहरी
पांडुरंगाहरी
तें तीर्थांचे माहेर
तें तीर्थांचे माहेर
सर्व सुखाचें भांडार
सर्व सुखाचें भांडार
जन्म नाही रे आणीक
जन्म नाही रे आणीक
तुका ह्मणे माझी भाक माझी भाक
तुका ह्मणे माझी भाक भाक
चला पंढरीसी जाऊं
चला पंढरीसी जाऊं
रखमादेवीवरा पाहूं
चला पाहूं रखमादेवीवरा पाहूं
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
ज्ञानोबा माउली तुकाराम
ज्ञानोबा माउली तुकाराम
आधीं रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
आधीं रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
जेव्हां नव्हतें चराचर तेव्हां होतें पंढरपुर
आधीं रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
ज्ञानोबा माउली तुकाराम
ज्ञानोबा माउली तुकाराम
जेव्हां नव्हती गोदा गंगा तेव्हां होती चंद्रभागा
तेव्हां होती चंद्रभागा
चंद्रभागेचे तटीं धन्य पंढरी गोमटी
चंद्रभागेचे तटीं धन्य पंढरी गोमटी
पांडुरंगाहरी पांडुरंगाहरी
पांडुरंगाहरी पांडुरंगाहरी
नासिलीया भूमंडळ उरे पंढरीमंडळ
पांडुरंगाहरी पांडुरंगाहरी
पांडुरंगाहरी पांडुरंगाहरी
असे सुदर्शनावरी ह्मणूनि अविनाश पंढरी
नामा ह्मणे बा श्रीहरी नामा ह्मणे बा श्रीहरी
आह्मी नाचों पंढरपुरी
आह्मी नाचों पंढरपुरी
आधीं रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
ज्ञानोबा माउली तुकाराम
ज्ञानोबा माउली तुकाराम
ज्ञानोबा माउली तुकाराम