song lyrics / कृष्णा शिंदे / Chamke Shivbachi Talwar lyrics  | FRen Français

Chamke Shivbachi Talwar lyrics

Performers कृष्णा शिंदेकृष्णा शिंदे

Chamke Shivbachi Talwar song lyrics by कृष्णा शिंदे official

Chamke Shivbachi Talwar is a song in Marathi

पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
हो चमके शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
झेले ढालीवरती वार
हो चमके शिवबाची तलवार

पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त दौलतीसमोर केली ना लाचारी
कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्‍ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
हो चमके शिवबाची तलवार

शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी
पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे या तोबा या अल्ला
केला शाहिस्त्यावर वार
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
त्याची तुटली बोटे चार
हो चमके शिवबाची तलवार

तेव्हा अफझूलखाना क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
पहाड का चुहा हे शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा
बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
आओ मिलो हम से म्हणुनी खान भिडे शिवबाला
करून धोका अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणांत अफझुल ठार
केला क्षणांत अफझुल ठार
हो चमके शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
झेले ढालीवरती वार
हो चमके शिवबाची तलवार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANIL BHARATI, MADHUKAR PATHAK
Copyright: Royalty Network

Comments for Chamke Shivbachi Talwar lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Forgot your password ?
Create an account (free)
Select in the following order :
1| symbol to the right of the calculator
2| symbol to the left of the camera
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid